मोदींची केली स्तुती, शशी थरूर यांना काँग्रेसकडून नोटीस

वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना महागात पडले.

या प्रकरणी केरळ काँग्रेसने थरूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले. तर,तुम्ही सहमत नसला तरी माझ्या मतांचा आदर करा, अशा शब्दांत थरूर यांनी काँग्रेस नेत्यांना उत्तर दिले.

शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवणे योग्य नसून त्यांच्या चांगल्या कामांचे कौतुकही केले पाहिजे, असे जाहीर वक्तव्य केले.

त्याआधी काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू संघवी यांनीही असं ए मत व्यक्त केले होते.

थरूर यांच्या या वक्तव्याची केरळ काँग्रेस कमिटीने गंभीर दखल घेतली असून मोदींची स्तुती केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले.

तसेच याबाबत थरूर यांची हायकमांडकडे तक्रार करण्याचा निर्णयही केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे.

थरूर यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करणार असल्याचे केपीसीसी अध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रन यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post