खुशखबर : सशस्त्र पोलीस दलाचे निवृत्ती वय आता ६० वर्षे

वेब टीम : दिल्ली
केंद्र सरकारने आता सर्व केंद्र सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांचे निवृत्ती वय ६० केले आहे.

ही माहिती केंद्रीय गृह खात्याने एका सरकारी पत्रकाद्वारे सोमवारी पीटीआयला दिली.

केंद्रीय गृह खात्याने काढलेल्या या सरकारी पत्रात केंद्रीय सशस्त्र पोलिस बलामध्ये कार्यरत असलेल्या जवानांसाठी सरकारने निवृत्ती वय ६० वर्षे निश्चित केले आहे.

या सरकारी आदेशामुळे कॉन्स्टेबल ते कमांडन्ट या उतरंडीच्या प्रत्येक पायरीवरील जवानाचे निवृत्तीवय आता सरसकट ६० वर्षे झाले आहे.

याचा थेट फायदा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये समाविष्ट असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस बल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा बल (बीएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलिस बल व सहस्र सीमा बल या चार दलांना होणार आहे.

या चार दलांमधील उप महानिरीक्षक (डीआयजी) या पदापासून ते महासंचालक (डीजी) या पदापर्यंतच्या व्यक्ती साठाव्या वर्षी निवृत्त झाल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post