‘नेटफ्लिक्स’वर प्रियांका चोप्रा होणार ‘सुपरहिरो’

वेब टीम : मुंबई
आता देसी गर्ल प्रियांका चोप्राने आपले लक्ष वेब सीरिज दिशेने वळवले.प्रियांका नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजमध्ये सुपरहिरो अवतारात झळकणार आहे.

हि मालिका विशेषत: लहान मुलांसाठी असून याचे नाव वी कॅन बी हिरोज असे आहे. हॉलिवूड सिनेसृष्टीतील महागड्या दिग्दर्शकांपैकी एक रॉबर्ट रॉड्रिग्ज या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत.

सध्या या मालिकेच्या संकल्पनेवर काम सुरु आहे. तसेच प्रियांका चोप्राच्या भूमिकेबाबत नेटफ्लिक्सने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

या वेबसिरीजच्या निमित्ताने प्रियांका प्रथमच मायक्रो पडद्यावर दिसणार आहे, त्यामुळे चाहत्यांना याबाबत निश्चितच उत्सुकता लागून राहिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post