चक्रीवादळावर अणुबॉम्ब टाकण्याचा ट्रम्प यांचा अजब सल्ला

वेब टीम : न्यूयॉर्क
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. यात आणखी के भर टाकणारे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी पुन्हा केले.

अमेरिकेच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळांना थांबवण्यासाठी ही चक्रीवादळे किनारपट्टीला धडकण्याआधीच त्यावर अणुबॉम्ब टाकण्याचा अजब सल्ला ट्रम्प यांनी दिला.

‘वादळांच्या केंद्रभागी अणुबॉम्ब टाकून अफ्रीका खंडाजवळच्या समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची निर्मिती थांबवता येईल का?’ अशी विचारणा ट्रम्प यांनी केल्याचे एका अमेरिकन संकेतस्थळाने दिले.

त्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी चक्रीवादळांची निर्मिती थांबवण्यासाठी अणुबॉम्ब वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर काय मत व्यक्त करणार असा विचार सर्वचजण करत होते असे यात म्हटले आहे.

चक्रीवादळे थांबवण्यासाठी अशा प्रकारचा जगावेगळा उपाय सुचवण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ नाही.

या आधीही त्यांनी २०१७ मध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ‘चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्या पूर्वी त्यावर अणुबॉम्ब टाकता येईल का?,’अशी विचारणा केली होती.

मात्र ट्रम्प यांनी अशाप्रकराचे कोणतेही मत व्यक्त केले नसल्याचे स्पष्टीकरण व्हाइट हाऊसने दिले आहे.

तरीही एका या संकेतस्थळाच्या प्रतिनिधींशी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ट्रम्प यांच्या कल्पनेमागील विचार चुकीचा नाहीय’ असे मत व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post