7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट : सुधीर मुनगंटीवार


वेब टीम
मुंबई  - 7 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दिवाळीमुळे चर्चेला उशीर झाला, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसंच येत्या एक-दोन दिवसात चर्चेला सुरुवात होईल, असंही त्यांनी सांगितलं.

पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post