संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी येथील पाच, नवघर गल्ली येथील एक तसेच संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील ०२, खांडगाव, , चिखली येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळून आला आहे. नेवासा तालुक्यातील गुंडगाव येथील एक, जामखेड तालुक्यातील लोणी (पोस्ट - खर्डा) येथील एक रुग्ण बाधित आढळले आहेत.
नगरमध्ये शनिवारी ६३ कोरोनाबाधित
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा तालुक्यातील एक, जामखेड तालुक्यातील एक आणि पुणे जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.
नगर शहरात गुलमोहर रोड, आशा टॉकीज आणि सारसनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. विश्रांतवाडी (पुणे) येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४७ रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३४, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०२, राहाता ०३, संगमनेर ०४ आणि श्रीरामपूर येथे ०२ रुग्ण बाधित आढळले आहेत. *उपचार सुरू असलेले रुग्ण: ३१९* *बरे झालेले रुग्ण: ५६८* *मृत्यू: २०*
Post a Comment