अहमदनगर : नगर जिल्ह्यातील जामगाव येथील अर्चना महादेव यांची मुख्य भूमिका असणारा चित्रपट मसुटा लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहे. आपल्या नगरच्या मातीत आणि रंगभूमीवर वाढलेल्या अर्चना महादेव हिने अनेक नाटकांमध्ये काम केले. अनेक लघुपटात तिने प्रमुख भूमिका साकारत तिचा कलेविषयीचा प्रामाणिकपणा आणि प्रेम सिद्ध केलं. या आधी सुद्धा अनेक फेस्टिवल मधे बेस्ट एक्ट्रेस म्हणून नामांकन आणि अवार्ड सुद्धा अर्चनाला मिळाले आहे.
आता काशिबाई फिल्मस निर्मित स्मशाणभूमीतील 'जीवांच्या' आयुष्यावर भाष्य करणारा *मसुटा* हा मराठी चित्रपट एम.एक्स.प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन येत्या ६ अॉगस्ट रोजी जगभर प्रदर्शित झाला आहे. अर्चनाची यात प्रमुख भूमिका आहे.
तसेच निर्माते आणि लेखक भरत मोरे, निर्माते मनेष लोढा व सहनिर्माते सुनिल शिंदे आहेत. या चित्रपटाची कथा स्मशाणभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार करणा-या मसणजोगी कुटुंबवार त्यांच्या समाजावर आधारीत आहे. त्यांच्या जगण्याचे हाल, सामाजिक स्थान, त्यांची स्वप्ने आणि बिकट परिस्थीतीतही मनात अंकुरणारे मसणजोग्याच्या मुलीचे प्रेम असे विषय या चित्रपटात हाताळण्यात आलेले आहेत. मसुटाचे संपूर्ण चित्रीकरण कोपरगाव व सवंस्तर या ठिकाणी झाले आहे.
कथेला साजेशे संवादलेखन अनिल एस.राऊत यांनी केले असून अनुभवी दिग्दर्शक अजित देवळे यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मसुटाचे दिग्दर्शन केले आहे. मसुटाचे संपूर्ण चित्रीकरण कोपरगाव सवंस्तर या ठिकाणी झाले आहे.
या चित्रपटात हिंदी,मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी अभिनय केलेला आहे.
प्रेम,विनोद,दुःख,अत्याचार,विद्रोह यांनी परिपूर्ण असा हा चित्रपट आहे.६ अॉगस्ट पासुन प्रेक्षकांना हा चित्रपट एम.एक्स.प्लेयरवर घरबसल्या पाहता येणार आहे.
Post a Comment