फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' थोडेसे बदल


   

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्दी आणि फिट राहणं जवळजवळ कठीणच झालं आहे. खरंतर चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारपणं आणि आरोग्य समस्या आपला पाठलाग करू लागतात.आजकालच्या फास्ट जगात पुरेशी झोप आणि सतुंलित आहार तर कुणीही घेताना दिसत नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची ऐवढी घाई असते की वर्तमान क्षण जगायचा राहूनच जातो. ज्यातूनच पुढे आरोग्य समस्या निर्माण होऊ लागतात. प्रत्येकाला निरोगी आणि उदंड आयुष्य हवं असतं. पण निरोगी आयुष्य हे सहज मिळत नाही तर ते कमवावं लागतं हे मात्र सर्वच सोयीनुसार विसरुन जातात.  

मागील काही दिवसांपासून जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, वारंवार तुम्हाला सर्दी - खोकल्याचा त्रास होत असेल तर याबाबत विनाकारण चिंता करत बसण्यात काहीच अर्थ नाही कारण त्यामुळे काहीच फायदा होणार नाही. धावपळीच्या नादात तुम्ही योग्य आहार घेत नाही, रात्रीच्या जागरणामुळे तुमची पुरेशी झोप होत नाही. या सर्वच गोष्टी तुमच्या आरोग्य समस्यांसाठी कारणीभूत आहेत.

 त्यामुळे जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृती हवी असेल तर त्यासाठी स्वतःला थोडासा वेळ द्या. कारण तुम्ही जी सारी धावपळ करत आहात ती स्वतःसाठी आणि कुटूंबासाठीच करत आहात. तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही कुटूंबाला सुखी ठेऊ शकाल. हेल्थ इज वेल्थ हे तर आपण आतापर्यंत कितीवेळा ऐकलं असेल. मग फक्त पैसा कमविण्यासाठी वणवण करण्यापेक्षा थोडं आपल्या शरीराकडे पण लक्ष द्या. कारण सिर सलामत तो पगडी पचाच अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. तुम्ही जे काही कमावलं आहे ते उपभोगण्यासाठी तुमचं शरीर निरोगी असणं फार गरजेचं  आहे. 

दैनंदिन जीवनशैलीमध्ये अगदी थोडेसे बदल करुन तुम्ही या निरोगी जीवनाच्या दिशेने पुन्हा वाटचाल करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी  थोडा वेळ काढण्याची, नियमित व्यायाम करण्याची आणि आहारामध्ये योग्य बदल करण्याची गरज आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post