दहावी आणि बारावीवर नोकरी मिळते, जागा सुटल्यात करा अर्ज

मुंबई : दहावी आणि बारावीनंतर ही शैक्षणिक पात्रता आजच्या काळात तोकडी वाटेल. काहीअंशी ते खरेही आहे. परंतु बऱ्याच जागा अशा आहेत की तेथे दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक पात्रतेवर नोकरी मिळते. ही जाहीरात तुमच्याचसाठी आहे.

कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) नव्या रिक्त पदांसाठीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे. आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती आयोजित केली असून यासाठी परीक्षाही लवकर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून ग्रुप सी आणि डी मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी ही भरती परीक्षा सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधीच आहे.

आयोगाने आपल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, या भरती परीक्षेसंदर्भातील अधिसूचना २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केली जाणार होती. पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता एसएससी एमटीएस परीक्षा २०२१ ची अधिसूचना ५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केली जाईल. 

- SSC CGL 2021: अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस; ६५०६ पदांसाठी होणार भरती​

आवश्यक पात्रता -

किमान १८ ते कमाल २५ वर्षापर्यंतचे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post