पुण्याच्या प्रवाशांवर काळाचा घाला, कार कोसळली दरीत

अहमदनगर ः पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून संगमनेर दिशेने जाणाऱ्या कारचा भीषण अपघात सायंकाळी पाच वाजता बोटा शिवारातील झाला. बाहयवळणाच्या पुलावरून कार खाली तीस फूट कोसळल्याने चार पैकी दोन जणांचा मृत्यू होऊन अन्य दोन गंभीर जखमी झालेले आहेत,याबाबत समजलेली माहिती अशी कार क्रमांक एम एच १२ एच झेड ७५८२ ही कार पुणे येथून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होती.


सायंकाळी  पाचच्या सुमारास बोटा शिवारातील बाह्यवळणावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून  तीस फूट खाली कोसळली.रस्त्यालगतच्या लोखंडी फलक   तोडून ओढ्यात कोसळलेल्या कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती समजताच स्थानिक  नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कार मधून जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आळेफाटा  व संगमनेर येथील रूग्णालयात पाठवले आहे.

आळेफाटा येथे उपचार घेणाऱ्या आशिष रा. गोरखपूर , उत्तर प्रदेश ( पूर्ण नाव समजले नाही ) या तरूणाचा मृत्यू झाला.तर सानिका लागू ( नौपाडा,जि.ठाणे) जखमी अवस्थेत आहे.याशिवाय संगमनेर येथे पाठविलेल्या दौघेही रा. बिबवेवाडी,जि.पुणे येथील असून माहीदेवस्थळे या महिलेचा मृत्यू झाला आहे.तर अनंत देवस्थळे मात्र जखमी अवस्थेत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post