काल तुम्ही पॅन कार्ड लिंक केलं का, बघा सरकारचा निर्णय काय झाला

नवी दिल्ली : आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख दिली होती. त्यामुळे प्रत्येकजण त्यासाठी धावपळ करीत होता. यापूर्वी सरकारने सलग तीन वर्षे मुदतवाढ देऊनही कोणही पॅनकार्ड लिंक केले नाही. केंद्र सरकारने याबाबत संसदेत कायदाच केला होता. त्यामुळे तब्बल एक हजार रूपये शुल्क लागणार होतं. त्यानंतर पॅन बंद पडणार होतं.


आयकर विभागाने सोशल मीडिया हॅन्डलवरून मुदतवाढीविषयी मोठी घोषणा केलीय. मुदतवाढ देताना कोविडचे कारण पुढे केले आहे. आता ही मुदत ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय पॅन आधार क्रमांकाला जोडता येईल.

आयकर विभागाचे सर्वर काल डाउन झाले होते. त्यामुळे अनेकांना पॅन लिंक करता आले नाही. परिणामी अनेकांच्या पदरी निराशाच पडली. 'वित्त विधेयक २०२१' संमत झालं आहे. 'आयकर कायदा १९६१' मध्ये नव्या कलम २३४ एचची तरतूद केली होती. पॅन आधारला लिंक नसेल तर हजार रुपयांपर्यंतच दंड होणार होता. जोडणी न करणाऱ्याचे पॅनही निष्क्रिय झालं असतं. परंतु तब्बल ३० जूनपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील धाकधुक कमी झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post