साहेबांची प्रकृती बिघडली, पुन्हा ब्रीच कँडीत अॅडमिट

 मुंबई ः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीच ट्विटद्वारे माहिती दिली.

मंत्री मलिक यांनी टि्वट करताना म्हटले आहे की, पवार यांच्यावर उद्या (बुधवारी) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. परंतु आजच त्यांना त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केले आहे. गालब्लॅडरचा त्रास होत असल्याने ही शस्त्रक्रिया होणार आहे.

जास्तीचे स्निग्ध पदार्थ खाल्याने, आहार-विहार व्यवस्थित नसल्याने हा आजार होतो. तो पित्ताशयासंदर्भातील आहे. हा आजार तुमच्या आमच्यासारख्यांनाही होऊ शकतो. जास्तीचे तेलकट, तुपकट खाऊ नये. पनीर, शेंगादाणे, खोबरे मोजकेच खावे, असा या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्ला देतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post