एक तारखेपासून काय काय महागणार पहा

मुंबई - मार्चएण्ड जरी संपणार असला तरी नवीन आर्थिक वर्ष तुमच्या आमच्यावर बोजा चढवल्याशिवाय राहणार नाही. काही गोष्टी महाग होणार असल्याने १ एप्रिलनंतर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे खरेदीसाठी चारच दिवस उरलेत.एप्रिलनंतर कार आणि बाईकचे रेट वाढतील. मारूती, निसानसारख्या कंपन्यांनी भाववाढ करण्याचे दर जाहीर केले आहेत. टीव्हीच्या किंमती आधीच ३ ते ४ हजार रूपयांनी महागलेल्या आहेत. त्यात १ एप्रिलनंतर टीव्हीच्या किंमतीत आणखी २ ते ३ हजार रूपयांनी वाढ होईल.
 


उन्हाळा वाढत चालला आहे, त्यामुळे तुम्ही एसी किंवा फ्रीजही महागणार आहे. ४ ते ६ टक्क्यांनी या किंमती वाढू शकतात. प्रति युनिट एसीच्या किंमती १,५०० ते २ हजाराच्या घरात जातील.

विमानाने भ्रमंती करणार असाल, तर तुमचा खर्च वाढेल. देशांतर्गत विमानप्रवासासाठी हे शुल्क २०० रूपये होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानप्रवासासाठी हे शुल्क ५.२ डॉलरवरून १२ डॉलरवर जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post