तुम्हाला शिधापत्रिकेवर धान्य मिळतं? मग ही आहे तुमच्यासाठी खुशखबर

अहमदनगर ःशिधापत्रिकेवर तुम्हाला धान्य मिळेल असेल तर तुमच्यासाठी या महिन्यात खुशखबर आहे. तुम्हाला सरकारने दोन गोष्टी विशेष म्हणून दिल्या आहेत. गरीब लोकांसाठी याचा फायदा होणार आहे. तुम्ही धान्य भरले नसेल तर लगेच दुकानात जा विचारा.

आठ तालुक्‍यांतील शिधापत्रिकाधारकांना मका, तर दोन तालुक्‍यांतील शिधापत्रिकाधारकांना गव्हाबरोबरच ज्वारीही दिली जाणार आहे. नगर शहरासह चार तालुक्‍यांतील शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. 

 


अंत्योदय योजनेत प्रतिकार्ड 25 किलो धान्य आणि 10 किलो तांदूळ दिला जात आहे. अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर आणि नगर शहर हद्दीतील लाभार्थीना प्रतिकार्ड 25 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ दिला जाणार आहे. कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी तालुक्‍यातील लाभार्थींना 5 किलो गहू आणि 20 किलो मका दिली जाणार आहे. शेवगाव आणि नेवासे तालुक्‍यांतील लाभार्थींना सात किलो गहू आणि 18 किलो ज्वारी दिली जाणार आहे. त्याचबरोबर 10 किलो तांदळात कोणतीही घट झालेली नाही. 

प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांसाठी धान्य दिले जाते. अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर आणि नगर शहरातील प्रतिव्यक्‍ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे.
कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड, नगर तालुका, तसेच पाथर्डी तालुक्‍यातील लाभार्थींना प्रत्येक व्यक्‍तीसाठी एक किलो गहू आणि दोन किलो मका दिली जाणार आहे. शेवगाव आणि नेवासे तालुक्‍यांतील व्यक्‍तींना प्रत्येकी एक किलो गहू आणि दोन किलो ज्वारी दिली जाणार आहे. तांदळाच्या नियतामध्ये कोणताही बदल केलेला नाही. प्रत्येक व्यक्‍तीला दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post