Breaking News पारगांव भातोडीत आढळले 19 कोरोना पॉझिटिव्ह

 
 


अहमदनगर ः नगर तालुक्यातील पारगांव भातोडी येथे प्राथमिक मेहेकरीतील आरोग्य केंद्र व पारगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभापती सुरेखाताई संदीप गुंड यांच्या नेतृत्वाखाली कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

गावात एकूण 126 तपासणी करण्यात आली. त्यापैकी 19 कोरोना बाधित रुग्ण आढळले. या रुग्णांना चिचोंडी पाटील येथील कोविड सेंटरला पाठवण्यात आले. पंचायत समिती सभापती सुरेखाताई गुंड यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात तापसणी करून घेण्याचे आवाहन केले होते.

सदरील शिबिर पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मेहेकरी यांचा कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत पारगांवचा कर्मचारी वर्ग, सरपंच मीनाक्षी संतोष शिंदे, युवा व्याख्याते गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड, महेश शिंदे, प्रसाद पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post