शिष्य पंतकडून हारल्यानंतर गुरू धोनी चिडला! गोलंदाजांना झापताना म्हणाला...

 


मुंबई : चौदाव्या हंगामातील आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात शिष्याने गुरूलाच खडे चारले. हो, ही स्टोरी आहे महेंद्रसिंग धोनी विरूद्ध ऋषभ पंत या गुरू-शिष्य लढाईतील. गुरू शिष्याला हरविल असंच सर्वाचं म्हणणं होतं. परंतु झालं उलटंच. शिष्याने गुरूला खाली बघायला लावलं. त्यामुळे गुरूमहाराज धोनी चांगलेच चिडले आहेत.

ऋषभ पंत याने टीम इंडियात धोनीचा वारसा चालवला आहे. तो धोनीला गुरू मानतो. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळे त्यांच्यात ही पहिलीच लढत होती. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ याने चेन्नईच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपून काढले.

धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा तो पहिल्याच चेंडूवर त्रिफळा चीत झाला. मात्र, सुरेश रैनाने त्याच्या टीमला चांगला स्कोर उभारून दिला होता. परंतु त्यांच्या गोलंदाजांना चांगलाच मार पडला.
शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी शो दाखवला. 54 चेंडूत 85 धावा फटकावणारा शिखर मॅन अॉफ दी मॅच ठरला. शॉने केवळ 38 चेंडूत 72 धावा केल्या. त्यांच्या भागिदारीमुळेच दिल्ली जिंकली.

धोनी म्हणतो, 'आम्हाला विकेट्स घेता आल्या नाही. आम्ही आमच्या गोलंदाजांना यापुढे ही चूक करू देणार नाही. असं मोजकंच बोलला असला तरी नंतर त्याने गोलंदाजांना त्याने चांगलेच झापलं.'

शार्दुल ठाकूरला चांगलाच मार पडला. त्याच्या 3.4 षटकात तब्बल 53 धावा कुटल्या. ब्राव्होने 28 धावांत एक गडी बाद केला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन याने सर्वांचीच धुलाई केली.

सामन्यानंतर पंत काय म्हणाला?
पंत म्हणतो धोनीसोबत टॉस केला तो माझ्यासाठी हा सुवर्णक्षण होता. त्याच्याकडून मी मार्गदर्शन घेत असतो. त्याने खूप शिकवलंय. तो माझा गो टू मॅन आहे. काल झालं ते माझ्यासाठी स्वप्नांपेक्षा कमी नव्हतं. '


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post