Big Breaking सगळेच विद्यार्थी वरच्या वर्गात, सरकारचा मोठा निर्णय

 मुंबई ः कोरोना परिस्थितीने सर्वांचेच रोजगार हिरावले होते. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली. मध्यंतरीच्या काळात वातावरण थोडेसे शांत झालेले असताना माध्यमिकचे वर्ग सुरू झाले. परंतु पुन्हा प्रादूर्भाव वाढल्याने पालकांसह सरकारचीच चिंता वाढली. आता अभ्यासच शिकवून झाला नाही म्हणाल्यावर परीक्षा तरी कशी देणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना होता. ही अडचण ओळखून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.कोविड पिच्छा सोडत नसल्याने शाळा बंद करण्यात आल्या. मागील वर्षी जास्तीचा प्रादूर्भाव  होत असल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घालण्यात आलं. यंदाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसा निर्णय घेतला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणालाही नापास करता येत नाही. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घातले जाते. त्यासाठी शाळेत मूल्यमापनासाठी परीक्षा घेतली जाते. परंतु तीही वेळ शाळा व्यवस्थापनावर येणार नाही. सरसकट विद्यार्थी उत्तीर्ण केले जाणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीच तसा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून परीक्षेच्या संदर्भात तशी घोषणा केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post