राम सेतूविषयी या काही आश्चर्यकारक गोष्टी! शास्त्रज्ञांनाही उलगडेना कोडं

 

कोईमतूर : राम आणि रामायण हा भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे. सीतेचे हरण ज्या मार्गाने झाले, त्या मार्गाचे आजही संशोधन केले जाते. समुद्रातून वानरांनी रस्ता बांधला तो म्हणजे रामसेतू. तो कसा झाला याचा किस पाडला जात आहे. तो अॅडम ब्रिज नावानेही ओळखला जातो. काहीजण सांगतात तो नैसर्गिक आहे, तेथे समुद्र उथळ आहे. त्यामुळे तो तयार झाला आहे. तर दुसरे अमेरिकन शास्त्रज्ञ सांगतात, तो मानवांनीच बांधला असावा.


शास्त्रीय आधार घ्यायचा झाला तर तामिळनाडू पूल पंबन बेटांसह श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडला जातो. पाहूया नेमका कसा पूल आहे हा.

रामसेनेने बांधलेला पूल हा उंचावर होता. गेल्या पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत त्यावरून चालता येत होते. काही इतिहासकारांनी तशा नोंदीही केल्यात.

हा पूल नेमका कसा बांधला, याचा उलगडा होत नाही. पुलाच्या बांधकामात दगडं वापरली आहेत. नेमकी ती कशी जोडली, त्यावेळी कोणते तंत्रज्ञान उपलब्ध होते, याचाही शोध लागलेला नाही.

याला अ‍ॅडम ब्रिज, नल सेतू आणि सेतू बंधा अशी नावे आहेत. परंतु हा राम सेतू नावाने जास्त ओळखला जातो. नलानेच राम सेतू बांधला असल्याने त्यालाही क्रेडिट दिलं जाते.

चक्रीवादळ आल्याने पुल पाण्याखाली गेल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी पाण्यात तर काही ठिकाणी तो वरूनही दिसतो. हा पूल 7000 वर्ष जुना आहे, असे समुद्रशास्त्राच्या अभ्यासातून दिसते. पुरातत्वीय अभ्यासानुसार विचार केला तर हा पूल सात हजार वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. इजिप्तही पिरॅमिडचा कालखंडापेक्षाही तो जुना आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post