अनुप जलोटा या वयातही पडले मुलीच्या प्रेमात

  मुंबई ः भजनसम्राट, गायक अनुप जलोटा यांचा गण्यांसोबतच अनेक गोष्टींमध्ये जलवा असतो. ते आपल्या आयुष्यात आलेल्या मुलींबाबतही स्पष्टपणे बोलत असतात. आता त्यांचे वय झालेय असं कुणी म्हणू नये. सध्या ते अवघे  67 वर्षांचे आहेत.
 

अनूप जलोटा हे जसलीन मथारू या आपल्या शिष्येला घेऊन फिरत आहेत. त्यांच्याविषयी गेल्या काही वर्षांपासून बोललं जातं. लोकांची तोंडं बंद करण्याची ते तसदी घेत नाहीत. ती मुलगी आणि हे आपले अनुपची बिग बॉसमध्ये येऊन गेलेत. तेथेही त्यांच्या लवस्टोरीचे किस्से लोकांनी ऐकले आहेत.
 

'मुझे जब से हुआ है प्यार' असं गाणं गात असलेला व्हिडिओ अनुप यांनी शेअर केला आहे. ती मुलगीही स्माईल देताना व्हिडिओत दिसतेय. जलोटा यांचे अनेक फॅन्स आहेत. ते त्यांची कधी खेचत असतात तर कधी त्यांच्या लवस्टोरीला चिअर्स करताना दिसतात.   
अनूप आणि जसलीन हे एका चित्रपटातून लोकांच्या भेटीला येत आहेत. त्याचेच प्रमोशन आहे का, असा चाहत्यांचा सूर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post