या मराठी पोलिस अधिकाऱ्याला थर्र कापतात मुंबईचे गुन्हेगार..!

मुंबई ः मुंबईत नेहमीच परप्रांतीय पोलिस अधिकाऱ्यांची चलती राहिली आहे. मोजकेच मराठी अधिकारी आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. कोणत्याही प्रसिद्धापासून दूर असलेले एक मराठी अधिकारी गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरले आहेत. त्यांच्या कामाच्या स्टाईलने गुन्हेगारांना थरकाप सुटतो. ते सिद्धहस्त लेखकही आहेत. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक गुन्हे उघडकी आणले आहेत. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या या अधिकाऱ्याची कामाची स्टाईल हटके आहे. त्यांचं नाव म्हणजे बी.जी. शेखर पाटील. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेत ते अप्पर पोलीस आयुक्त आहेत. पोलिसांवर सामान्य माणसं नेहमीच संशयाच्या दृष्टीने पाहत असतात. परंतु  शेखर पाटील हे नेहमीच प्रामाणिकपणात वरच्या स्थानावर राहिले. मेहनत तर त्यांच्या अंगी बाणलेली आहेच. संवेदनशील आणि कर्तृत्ववान अधिकारी अशीच त्यांची ओळख आहे. मिस्टर ब्रिलियंट अशी उपाधीही लोकांनी त्यांना बहाल केलीय.

सिद्धहस्त लेखक

शेखर पाटील हे प्रेरणादायी वक्तेही आहेत. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक तरूण प्रेरित झाले. त्यांनी पोलिस दलात जाऊन देशसेवा निवडली. त्यांची लेखणीची स्टाईलही हटके आहे. पोलिस दलात काम करीत असताना त्यांच्यातील लेखकालाही त्यांनी उजव्या स्थानी ठेवलं. त्यांचा "शोध" -"प्रतिशोध" हा रहस्यमय कथासंग्रह वाचकांना बांधून ठेवतो. तपासातील बारकावे, गुन्हेगारांची मानसिकता याचे चित्रण त्यांच्या कथासंग्रहात सापडतं.

सरफरोश चित्रपटाचे खरे हिरो बी.जी. शेखर पाटीलच
तुम्ही सरफरोश चित्रपट हा चित्रपट पाहिला असेल. त्या चित्रपटाची संपूर्ण कथा बी.जी. शेखर पाटील यांच्या जीवनावर बेतली आहे. वाचन आणि चिंतन हे त्यांच्या यशाचे गमक असावे. "गनिमी काव्याचे सरसेनापती संताजी"  या ग्रंथाची निर्मितीही ते करीत आहेत. यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज यावा. क्राईम या विषयात पीएच.डी. केलेले ते पहिलेच पोलीस अधिकारी आहेत.अशी जपतात सामाजिक बांधिलकी
बी.जी. शेखर पाटील यांच्याबाबत जे जाणतात, ते त्यांच्या कर्तृत्त्वाला सॅल्यूट केल्याशिवाय राहत नाहीत. सामाजिक बांधिलकीतही ते अग्रभागी आहेत. त्यांनी वृक्षरोपणाचीही आवड जोपासली आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नेहमीच त्यांचे उपक्रम सुरू असतात. गेल्या वर्षी त्यांनी औरंगाबादजवळ तब्बल दहा हजार रोपे लावली. सरकारी अधिकाऱ्याच्या हाताने लावलेली झाडे कधीच उगवत नाही, असं लोकं चेष्टेने म्हणतात, परंतु शेखर पाटील त्याला अपवाद आहेत. त्यांनी लावलेली झाडं आता दहा फुटांच्याही वर गेली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post