TATA Tiago : ऑफरमध्ये बना अवघ्या साडेतीन हजार रूपयांत कारमालक

नवी दिल्लीः TATA हे नाव ऐकलं तरी प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून येतो. ते बिझनेसमन असले तरी नेहमी ग्राहकांच्या हिताचा विचार करतात. गरिबांना आवाक्यात कार यावी म्हणून रतन टाटा यांनी नॅनो बाजारात आणली होती. आता त्यांनी अशीच भन्नाट योजना आली आहे. केवळ साडेतीन हजार रूपयांत तु्म्हाला टाटाची कार खरेदी करता येईल.

विशेष म्हणजे TATA Tiago वर ही जबरदस्त ऑफर आहे. या कारला NCAPने आपल्या चाचणीत चार स्टार दिले आहेत.अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, ड्युअल फ्रंट एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर असले भारी भारी फिचर्स आहेत. असली कार कोणाला आवडणार नाही.

अशी आहे अॉफर
आता पाहूया नेमकी काय अॉफर आहे ते...TATA Tiago ची किंमत ४.८५ लाख रूपयांपासून ६.८४ लाख रुपयांपर्यंत जाते. आहे. सर्वसामान्य ग्राहकाला ती परवडली पाहिजे यासाठी अवघा ३५५५ रुपयांचा हप्ता त्यांनी पाडून दिला आहे.

असे आहे TATA Tiagoचे इंजिन
या कारमध्ये BS6 कम्पलायंट १.२ लीटर, ३ सिलिंडरची कॅपिसिटीचे पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येते. या कारला तज्ज्ञांनी चांगले रेटिंग दिलेले आहे. त्यामुळे ते कॉमन मॅनला परवडू शकते. कार घरी आणायची असेल तर टाटा टियागो चांगला पर्याय आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post