या चिनी लोकांनी कोरोनाविषयी नवीनच कुटाणा केलाय...

 

बीजिंग : ज्या कोरोनाने सर्व जगाला हैराण करून टाकलं, त्या चीनचं सगळं आगळंवेगळं असतं. ते कधी काय करतील याचा भरोसा नसतो. सध्या त्यांच्या देशातही कोरोना लसीचे उत्पादन सुरू आहे. परंतु त्यांची एकही लस म्हणावी तशी प्रभावी नाही. त्यांच्या लसीला जगातून फारशी मागणीही नाही. काय सांगावं लसीच्या नावाने त्यांनी कोरोनाचा नवा अवतार घुसरवला तर. त्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाहीत. परंतु प्रथमच ते लसींविषयी बोलत आहेत.

लशींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी नवीनच फंडा वापरलाय. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल एँड प्रिव्हेन्शनचे प्रमुख गाओ फू यांनी ही माहिती मीडियाला दिलीय.

चीनमध्ये लसीकरण सुरू आहे. काही त्यांचे मित्र देश लस विकत घेत आहेत.गेल्या वर्षींच त्यांच्याकडे लसीकरण सुरू झालंय. 161 दशलक्ष लोकांना लस घेतलीय. जूनपर्यंत 1.4 अब्ज लोकांपैकी 40 टक्के लोकसंख्येचं लशीकरण पूर्ण करण्याचा चीनचा मानस आहे.

तिकडेही आपल्यासारखाच लस टोचून घेण्यात निरूत्साह आहे. लशीची प्रभावक्षमता वाढवण्याचा एक उपाय म्हणजे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने तयार केलेल्या लशींचे डोस वापरणे, असं गाओ यांनी मीडियाला सांगितलं. सध्या त्यांच्याकडे तीन लस आहेत. त्या एकमेकांत मिक्स करायचं त्यांचं काम सुरू आहे, तसं केल्यास त्या प्रभावशाली होतील, असं त्यांच्या तज्ज्ञांना वाटतं. शेवटी ते चीनवाले आहेत. कशातही काही मिक्स करतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post