मेहेकरी झाले कंन्टेन्मेंट झोन, नगरमध्ये आढळले दीड हजार पेशंट

 


अहमदनगर
ः नगर जिल्ह्यात दररोज कोरोना पेशंटची रूग्णसंख्या वाढते आहे. दररोज किमान दोन हजार जण बाधित होत आहे. त्यामुळे सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. दररोज कंटन्मेंट झोनच्या संख्येतही वाढ होत आहे. निंबळससारख्या गावात सर्वानुमते लॉकडाउन करण्यात आला होता. रूग्णांच्या वाढत असल्याने नगर तालुक्यातील मेहेकरी हे गाव कंटेन्मेंट जाहीर केले आहे.

मेहेकरी गावात किमान पंधराजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने कंन्टेन्मेंट घोषित केले आहे. गावात २० एप्रिलपर्यंत हे निर्बंध असतील. मेहेकरीतील सदगुरू मठ, वेताळ वाडी, हाडोळा वस्ती, सदगुरू वस्ती, कुंभार वस्ती हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तहसीलदार उमेश पाटील यांनी हा आदेश काढला आहे. भिंगार मंडलाचे अधिकारी, मेहेकरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सेंदूरकर, कामगार तलाठी यांची समिती कंटेन्मेंट झोनवर नजर ठेवणार आहे.

गावातील वरील क्षेत्रात इतर कोणाला प्रवेश करता येणार नाही, तसेच या परिसरातील लोकांनाही इतर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित भागात बॅरिकेंटिंग केले जाणार आहे. चौदा दिवस संशयित रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याचाही आदेश आहे.

बॅरिकेटिंग करण्यात येणार असल्याने संबंधित भागात राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी भाजीपाला, दूध यांचे नियोजन सहायक नियंत्रण अधिकारी (ग्रामसेवक) यांनी करायचे आहे. आज जिल्ह्यात १ हजार ६५२ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post