मेहेकरीत कोरोनाचे रूग्ण वाढले, कोविड सेंटरसाठी सुधीर पोटे आक्रमक

 

 

मेहेकरी ः नगर तालुक्यातील मेहेकरी हे मोठे गाव आहे. या परिसरातील १५ ते २० गावांची येथे ये-जा असते. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोविडचे रूग्ण वाढत आहेत. परिसर कंटेन्मेंट झोन होऊनही कोणतीच उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे कोविडचे रूग्ण वाढत आहेत. येथे कोविड सेंटर न उभारल्याने  गोरगरिबाचे हाल होत आहेत.

नगर तालुक्यात 4 ठिकाणी कोविड सेंटर सुरू केली आहेत. हा परिसर महत्त्वाचा असूनही येथे का कोविड सेंटर सुरू होऊ शकत नाही. यावर लवकर कार्यवाही न झाल्यास आम्हाला लोकांसह रस्त्यावर उतरावे लागेल, असा परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकट्या मेहेकरी गावात 25 कोरोना बाधित आहेत. इतर गावांमध्येही रूग्णांची संख्या वाढते आहे. मेहेकरी फाट्याअंतर्गत लहान-मोठी बारा ते पंधरा गावे आहेत. त्यांना येथे सोय नसल्याने नगरला जावे लागते. तेथे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. संपूर्ण जिल्हाभरातून तेथे पेशंट जातात. त्यामुळे योग्य उपचार मिळत नाहीत.
सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सद्गुरू विद्यालय येथे शासनाने कोविड सेंटर सुरू करण्याचा उपाय सुचविला होता. परंतु त्यांच्या मागणीकडे कायम दु्र्लक्ष करण्यात आलं.

बारादरी, रतडगाव, रांजणी, माथनी, कौडगाव, बालेवाडी, जांब, पारगाव, पारेवाडी, सोनवडी, पिंपळगाव, शहापूर, केकती आशी मोठी गावे आहेत. या गावांना मेहेकरी येथे कोविड सेंटर उभारले तर दिलासा मिळेल, असंही सुधीर पोटे यांना वाटते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post