पिंपळगाव जोगाचे पाणी पेटले! आमदार लंके-सुजय विखे पाटलांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

 


अहमदनगर ः पिंपळगांव जोगा धरणाच्या आवर्तनावरून आमदार नीलेश लंके आणि खासदार डॉ. सुजय विखे यांच्यात चांगलेच घमासान सुरू आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे. आताही पिंपळगाव जोगाचे आवर्तन आमच्याच आमदारांमुळे सुटले आहे, असा दावा आमदार लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत खासदार विखे, आमदार लंके, जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसेच पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभयंता प्रशांत कडूस्कर यांच्यासोबत आवर्तनाबाबत बैठक झाली. त्यात आवर्तनाचा निर्णय झाला. याचा लाभ दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी उठवला आहे. त्यांनी आपल्याच नेत्यांमुळे हे आवर्तन सुटल्याचा दावा केला आहे.

गेल्या आवर्तनाचे पाणीच मिळाले नसल्याने लोकांत नाराजी होती. आवर्तन सोडण्याबाबत लंके यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली होती. अळकुटी येथे डॉ. विखे यांनीही आवर्तन सोडण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे लंके यांनी आमच्या प्रश्नात लुडबूड करू नका, असा इशारा दिला होता. तुमच्यात हिंमत आहे तर पुणेवाल्यांसोबत संघर्ष करा, असा टोला खासदार विखे पाटील यांनी मारला होता. पारनेरसाठी हे आवर्तन नऊ दिवसांचे असेल. पाण्यावरून आमदार-खासदारांत रंगलेला कलगी-तुरा नेमका कोणत्या थराला जातो, हे काळच ठरविल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post