हनुमंताच्या जन्मस्थळावरून वाकयुद्ध, दोन राज्यच एकमेकांविरोधात ठाकली

 

बेंगलुरू- भारतात धार्मिक प्रथा आणि परंपरांना मोठे महत्त्व आहे. देवादिकांच्या जन्मस्थानावरून तर कधी त्यांच्या जातीवरूनही वाद उदभवत असतो. असाच एक नवा वाद उभा राहिला आहे. राम भक्त हनुमान नेमका कोठे जन्माला आला, यासाठी दोन राज्यांमध्येच जुंपली आहे. त्यात संशोधक आणि देवस्थानेही उतरली आहेत.

तिरूपती देवस्थान समितीने तिरुमला टेकड्यावरच हनुमंत जन्माला आला. त्यानंतर तो सूर्याला गिळण्यासाठी गेला, असा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी ग्रंथाचा आधार घेतला आहे. दुसरा दावा आहे, कर्नाटकातील अभ्यासकांचा. हम्पी हे बल्लारी जवळीला ठिकाण आहे. पूर्वी किष्किंधा नगरी म्हणून प्रसिद्ध होते. ही नगरी वानरांची होती. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे भाविक संभ्रमात पडले आहेत.

‘तिरूमलातील एकावर डोंगरावर हुनुमंत जन्मला. त्या डोंगरावर व्यंकटेश्‍वर स्वामींचाही  रहिवास आहे.’’ पुरातत्वशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहास संशोधकांना हा दावा मान्य नाही.‘‘तिरूपती देवस्थानने अभ्यासक आणि धर्माचार्यांसोबत चर्चा करायला पाहिजे होती, असे कर्नाटकातील विश्व  हिंदू परिषद म्हणते. हम्पी किंवा विजयनगर साम्राज्याजवळचा परिसर म्हणजेच किष्किंधा आहे.’’ यावर संशोधकांचेही तेच म्हणणे आहे.

या दाव्या प्रतिदाव्यांमुळे दोन राज्यांत सांस्कृतिक युद्ध छेडले गेले आहे, हे नक्की. हम्पी येथील अंजानाद्री हेच हनुमानाचे जन्मस्थान असून येथील खडकांवर तशा प्रकारची वर्णन करणारी दृश्‍ये कोरलेलीत. संगमाकल्लू, बेलाकल्लू येथील गुहेत हनुमानाचे प्रतिबिंब आहेत.

बंगळूरमधील चित्रकला परिषद संस्थेतील कला इतिहास विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. राघवेंद्रराव कुलकर्णी म्हणतात, त्रेता युगाच्या काळामध्ये येथील लोकांनी रामाला मदत केली. आमच्या येथे हजारो हनुमान मूर्ती सापडतात, तिरूमलावर काहीच नाही. धारवाड विद्यापीठातील संशोधक ए. सुंदरा यांचेही तेच म्हणणे आहे. आनेगुंडीत अंगदाचा शाही महाल होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post