लागलं अखेर लॉकडाउन लागलं, बुधवारपासून संचारबंदी! काय आहेत नियम वाचा

 


मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसंदर्भात मोठी घोषणा केली. त्यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच राज्यात १४४ कलम लावले आहे. त्यामुळे अनावश्यक घराबाहेर पडता येणार नाही. राज्यात ४० ते ५० हजार वापरले जातात. रूग्णसंख्या वाढली तर ती दुप्पट होईल. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे कडक निर्बंध पाळावेच लागतील. नाईलाज म्हणून ही बंधनं लावावी लागत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत जाहीर केलं.

उणीदुणी काढू नका

ते म्हणाले, ही उणीदुणी काढू नका, ही ती वेळ नाही. पीएम मोदी यांच्यासमवेत यांच्यासमवेत हेच बोललो. हे फार मोठे संकट आहे. एकसाथ लढलो तर ही कोरोनाची साथ जाईल. हे निर्बंध लावतो आहे, ते आपल्यासाठीच आहे. याचा मला काही आनंद होत नाही. चर्चा आणि विचार विनिमयात घातला आहे. आता वेळ आली आहे. ही साखळी तोडायची असेल तर निर्बंध लावावेच लागतील. रोजीरोटी महत्त्वाची आहे. पण त्यापेक्षा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. ते वाचविण्यासाठी निर्बंधात वाढ करीत आहे.

पंढरपूरला वगळलं
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात अपवाद असेल. तेथील आमदार भारत भालके यांचे निधन कोरोनामुळेच झाले होते. त्यामुळे तिकडे मतदानानंतर कडक निर्बंध लावावे लागताहेत. आपण सर्वच गोष्टी आपण पाळल्यात. उद्या आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागतील.

हे सुरू राहील, हे बंद राहील...
संध्याकाळापासून ब्रेक दी चैन १४४ कलम लागू करीत आहे. किमान पंधरा दिवस संचारबंदी करावी लागेल.
कोणत्याही व्यक्तीला योग्य कारण नसेल तर घराबाहेर पडू नका.
तुम्हीच ठरवा घरात बसायचं. कोरोनाला नाही सरकारला मदत करा.
आवश्यक सेवा वगळून सर्वच आस्थापना बंद राहतील.
सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत आवश्यक सेवा चालू राहील.
सार्वजनिक सेवा चालू राहतील. त्यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही.
सेवा सुविधा देणाऱ्यांना मुभा असेल. (उदा. रूग्णालय, मेडिकल, डिलर्स, लस उत्पादक, मास्क, जंतूनाशक उत्पादक, जनावरांचे दवाखाने, शीतगृह, राजनैतिक कार्यालय उघडी राहतील.)
पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू राहतील.
सेबी आणि सेबीची कार्यालय, ई-कॉमर्स सुरू राहील.
अधिस्वीकृतीधारक पत्रकार,  पेट्रोल पंप सुरू राहतील.
बांधकाम साईटवाल्यांनी खबरदारी घ्यावी.
हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असतील. पार्सल सेवा सुरू राहील.
सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत हातगाडी लावू शकता.

मोफत धान्यवाटप 

गोरगरिबांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देणार आहोत. सात कोटी लोकांसाठी ही सेवा दिली जाईल. त्यामुळे त्यांची उपासमार होणार नाही.

शिवभोजन मोफत, यांना मिळेल मदत
दररोज दोन लाख थाळ्या गोरगरिबांसाठी दिल्या जातील. रोजी थांबेल परंतु रोटी थांबवू देणार नाही. यामुळे सरकारवर भार पडेल. परंतु सरकार हा भार सोसेल. संजय गांधी योजना, वृद्धापकाळ योजना अशा पाच योजनांसाठी १ हजार रूपये अर्थसाह्य आगाऊ दिले जाणार आहेत. ३५ लाख लोकांना याचा लाभ होईल.
इमारत कामगार कल्याण मंडळातील कामगारांना १५०० रूपये अर्थसाह्य मिळेल. असे १२ लाख लोक आहेत. घरेलू कामगारांसाठीही निधी दिला जाईल. अधिकृत फेरीवाल्यांसाठी १५०० रूपये दिले जातील. बँकांमार्फत ते मिळतील. असे पाच लाख लाभार्थी आहेत.

रिक्षाचालकांना मदत
परवानाधारक रिक्षाचालकांसाठी १५०० रूपये दिले जातील. १२ लाख लाभार्थी आहेत. आदिवासी समाजासाठी प्रतिकुटुंब ५ हजार रूपये दिले जातील. त्यातही १२ लाख लाभधारक आहेत.

कोविडसाठी पैसे
कोविड सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ३ हजार ३०० कोटी रूपये वेगळे दिले जाणार आहेत. ५ हजार ४०० कोटी रूपये यासाठी लागणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post