निंबळकचे माजी सरपंच विलासराव लामखडेंवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

 

अहमदनगर ः नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायत महत्त्वाचे राजकीय केंद्र आहे. या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासराव भाऊसाहेब लामखडे यांचे आज ( दि. १२ ) सकाळी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र स्ट्रोक आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. निंबळक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्योजक शरद ठाणगे यांनी समाज माध्यमातून ही माहिती दिली.

गावाच्या विकासात लामखडे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांचे ते बंधू तर सरपंच प्रियंका लामखडे यांचे ते सासरे होत. संजय लामखडे यांच्या निधनानंतर गावच्या विकासाची धुरा त्यांनी हाती घेतली. ते मनमिळावू स्वभावाचे असल्याने विरोधकांमध्येही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

 

दिलदार व्यक्तिमत्त्व होते. राजकीय विरोधक असले तरी त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे
संबंध होते. त्यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. घडलेली घटना निश्चितच वेदना देणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- डॉ. दिलीप पवार, उपसभापती, नगर.


कै. संजय लामखडे यांच्या निधनानंतर गावच्या विकासाची धुरा विलासराव लामखडे यांनी सतत दहा वर्षे सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात योग्य दिशेने विकास सुरू होता. पाणी योजना, रस्ते सुधारणा, दलित वस्ती सुधारणाही त्यांनी घडवून आणल्या. त्यांच्या निधनामुळे गावचे नुकसान झाले आहे. छत्रपती ज्योतिष समूहाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- संतोष घोलप, संस्थापक छत्रपती ज्योतिष समूह, महाराष्ट्र.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post