चिचोंडीला सभापती गुंड-उपसभापती पवार यांच्यामुळे मिळाले ३० बेड

 

अहमदनगर ः चिचोंडी पाटील रूग्णालयातील कोविड सेंटरच्या मदतीला सभापती आणि उपसभापती धावून आले आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे होगोनस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही मदत दिली आहे. या मदतीमुळे ग्रामीण भागातील रूग्णांना चांगली मदत होणार आहे. होगोनस इंडियाने चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयास ३० बेड, ३० गाद्या,१० ड्रम सॅनिटीझर, १००० मास्क व ५ ड्रम हँड वॉश दिले आहेत.

नगर तालुका पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती रामदास भोर व शिवसेना नेते संदीप गुंड यांच्या प्रयत्नातून होगोनस इंडियाने हे साह्य केले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करीत आहे.

चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेवसे यांनी बेडची कमतरता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सभापती गुंड व उपसभापती डॉ. पवार यांनी होगोनसच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी चिचोंडीच्या रूग्णालयास बेड व साहित्य देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते साहित्य ग्रामीण रुग्णालयास पोहोच करण्यात आले. तालुका उपप्रमुख जिवाजी लगड, संतोष काळे, अशोक काळे, रामदास शिंदे, नाना कोकाटे या शिवसैनिकांनी ते हॉस्पिटला सुपूर्द केले.

रेमडेसिव्हिरसाठीही पाठपुरावा

कोरोना महामारीच्या काळात समाजातील दानशूर लोकांनी समोर येऊन मदत करण्याचे आवाहन सभापती सुरेखाताई गुंड व उपसभापती डॉ दिलीप पवार यांनी केले. नगर तालुक्यातील रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी सभापती व उपसभापती प्रयत्नरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांनी रेमडेसिव्हिर आणि अॉक्सीजनसंदर्भात निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.

                                    

 Your A/C credited with Rs.334445

   Click here              

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post