तुम्ही मोबाईल रात्रभर चार्जिंग लावता का?

 


मुंबई ः मित्रांनो आपण दिवसभर मोबाईलचा वापर करतो, दिवसभराच्या कामाच्या गडबडीमध्ये आपल्याला फोन चार्ज करणे जमत नाही. घरी आल्यानंतर आपण फ्रेश होऊन जेवण करून मोबाईल हातात घेतो. तर बॅटरी लो झालेली असते, त्यावेळेस आपण फोन चार्जिंगला लावतो.

दिवसभर थकल्यामुळे लगेच झोपी जातो. अशा वेळेस मोबाईल रात्रभर चार्जिंगला तसाच राहतो. ज्यावेळी जाग येते त्यावेळेस  मोबाइल काढतो .मोबाईल 100% फुल चार्ज झालेला असतो. पण याचा कधी विचार केला आहे का की फोन रात्रभर चार्जिंगला ठेवल्याने काय होते? 

आपला फोन हा बॅटरी फुल झाल्याबरोबर काढणे फार गरजेचे आहे. त्यामुळे मोबाईल ओवरहीट ( गरम)  होत नाही. जर तो रात्रभर चार्जिंगला राहिल्यास तो ओवरहीट होऊन त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. बरीच मंडळी मोबाईल हा उशापाशी चार्जिंगला लावून देतात. ते तर फार धोक्याचे आहे. ओवर हीटिंगमुळे मोबाईलचा कधीही स्फोट होऊन मनुष्याला इजा होऊ शकते. त्यासाठी शक्यतो मोबाईल हा आपण जागे असतानाच चार्जिंग करून बाजूला काढून ठेवला पाहिजे. 

पूर्वी असं होतं..

पूर्वीच्या मोबाईलमध्ये बॅटरी लवकर चार्ज होत नसे परंतु आत्ताचे नवीन टेक्नॉलॉजीचे फोन आले आहेत, ते एका तासाभरात  शंभर टक्के बॅटरी फुल करतात. त्यामुळे थोडीशी जर काळजी घेतली तर आपला मोबाईल ओवरहीट होण्यापासून वाचू शकतो. मानवी आरोग्यास धोकाही निर्माण होत नाही आणि आपले नुकसानही टाळले जाते. त्यामुळे कोणीही मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावू नये. यामुळे आपला मोबाइलचे आयुष्यही वाढेल.

फटाफट चार्जिंगचे काही उपाय

मोबाईल चार्जरमध्ये दोष नसतो. बऱ्याचदा अडॉप्टर किंवा केबलमध्ये दोष असतो. त्यामुळे मोबाईल चार्जिंग होत नाही. दुसऱ्याचा चार्जर वापरला तर मोबाईलची बॅटरीही खराब होण्याची शक्यता असते.
कधी कधी प्लगमधून वीज जेवढी हवी तेवढ्या प्रमाणात येत नाही. त्यामुळे मोबाईल चार्जिंग होण्यास वेळ लागतो.
बऱ्याचदा मोबाईलच्या बॅकग्राउंडमध्ये बरेच अॅप चालू असतात. ते मोठ्या प्रमाणात बॅटरीची शक्ती खेचून घेतात. त्यामुळेही चार्जिंग होण्यास वेळ लागतो. ब्राईटनेस जास्त असल्यानेही चार्जिंग पटकन संपते.
 

(हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र परिवाराला ही पाठवा जेणेकरून ते सुद्धा आपल्या मोबाईलची काळजी घेतील आणि अपघात टळतील. त्यासोबतच तुमच्या मोबाईलचे आयुष्यही वाढेल.)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post