सोलर कार आली, एका चार्जिंगमध्ये धावणार ८०० किलोमीटर

मुंबई ः दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे टेन्शन वाढत आहे. सर्वांच्याच नजरा इलेक्ट्रॉनिक्स कारवर लागल्या आहेत. तर त्याही पुढे जाऊन काही कंपन्या सोलरवर चालणाऱ्या मोटारी बनवण्याच्या प्रयत्नांत आहेत. कॅलिफोर्नियाच्या (California) हंबल मोटर्सने (Humble Motors) सौरऊर्जेवर (solar energy)वरील वाहन बाजारात आणलंय.ही जगातील पहिलीच एसयूव्ही मोटार आहे. दिसायलाही चांगली आहे आणि चालवायलाही. तिच्या टपावर, खिडक्यांवर चार्जिंग पॅनल आहेत. क्रॉसओव्हर मॉडेलसारखेच हे मॉडेल आहे. सूर्यप्रकाशात ती आपोआप चार्ज होते. ती रोज साधारण 96 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

हंबल वनचे कमी आहे. Tesla Model Sच्या तुलनेत 348 किलोंने कमी आहे. गाडीच्या आतील बॅटरीवर एकाच चार्जिंगमध्ये साधारण 800 किलोमीटर धावते. टेस्लाच्या तुलनेत पीकअप जबरदस्त आहे. या गाडीत पाचजण बसू शकतात.

सगळ्यात महत्त्वाचे किंमत किती
हंबलने तांत्रिक माहिती दिली नाही. त्यामुळे किंमतीबद्दल निश्चित माहिती मिळाली नाही. तिची किंमत 1,09,000 अमेरिकन डॉलर्स असू शकते. हे वाहन 2024पर्यंत ग्राहकांना मिळेल. सध्या बुकिंग जोरात सुरू आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post