मेहेकरी कोविड सेंटरचा अखेर मुहूर्त ठरला..

मेहेकरी ः  नगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. नगर शहर जवळ असल्याने लोकांचा मोठ्या प्रमाणात एकमेकांसोबत संपर्क येतो. त्यामुळे तालुक्या रूग्ण संख्या वाढते आहे. या रूग्णांना नगर शहरात बेड मिळत नसल्याने त्यांची परवड होते आहे. त्यामुळे मेहेकरी येथे कोविड सेंटर उभारण्याची मागणी होत होती.
गेल्या दिवसांपासून मेहेकरी येथे कोविड सेंटर कधी होणार हा पंचक्रोशीसाठी चर्चेचा विषय ठरला होता. परंतु आता तो मुहूर्त ठरल्यामुळे चर्चेस विराम लागला आहे. उद्या दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता श्री सद्गुरु हायस्कूल मेहेकरी येथे कोविड सेंटर सुरू होणार आहे.

नगर तालुका बाजार समितीतर्फे हे कोविड सेंटर चालविण्यात येणार आहे. त्या कोविड सेंटरचे उद्घाटन होणार आहे. याप् रसंगी नगर-श्रीगोंदा मतदार संघाचे आमदार बबनराव पाचपुते साहेब, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच तहसीलदार उमेश पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत. 

श्री सद्गुरू हायस्कूलमध्ये कोविड सेंटर

मेहेकरी पंचक्रोशीतील कोणी आजारी असल्यास श्री सद्गुरु मेहेकरी हायस्कूल येथे संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. हे कोविड सेंटर सुरळीत चालण्यासाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले साहेब मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. बाजार समिती पुढे आल्याने परिसरातील लोकांची सोय होणार आहे.

सुधीर पोटे यांची मागणी

सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनी येथील कोविड सेंटरसाठी मागणी केली होती. त्यांनी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावाही केला होता. येथील हायस्कूलचा पर्यायही त्यांनीच दिला होता. मात्र, बाजार समितीने दोन पावले पुढे जात परिसरातील ग्रामस्थांसाठी हे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post