मेहेकरीतील कोविड सेंटरचे आमदार पाचपुते, माजी मंत्री कर्डिलेंच्या हस्ते उदघाटन

मेहेकरी ः नगर तालुक्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी माजी खासदार कै. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे सरसावली आहे. त्यांनी पुढाकार घेतल्याने मेहेकरी येथे कोविड सेंटर उभे राहिले आहे. या कोविड सेंटरमध्ये शंभर बेडची सुविधा आहे. याचा परिसरातील ग्रामस्थांना फायदा होणार आहे.

श्रीगोंदा-नगर तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते या कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी मांडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब खरसे, उद्योजक दीपक लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे, मेहेकरीचे सरपंच संतोष पालवे आदी उपस्थित होते.

सध्या हे कोविड सेंटरमध्ये कोणताही अॉक्सीजन बेड नाही. मात्र, येथे लवकरच अॉक्सीजन बेडची सुविधा केली जाईल. तशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. हे कोविड सेंटर सुरू झाल्याने परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले. सद्गुरू हायस्कूलमध्ये हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र माझाने या कोविड सेंटरसाठी सुरूवातीपासून पाठपुरावा केला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post