व्हॉटसअ‍ॅपचा मेसेज २४ तासांत होणार आपोआप डिलीट

 

मुंबई  हल्ली मोबाईल वापरत नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. अगदी ग्रामीण भागातही मोबाईल आहेत. मोबाईल खरेदी केल्यानंतर पहिलं डाउनलोड केलं जाते ते व्हॉटसअ‍ॅप. नंतर पुढे चालून या मोबाईलमधील मेसेजचा कंटाळा येतो. आणि मोबाईल हँग व्हायला लागतो. मग ते डिलिट करण्यातही वेळेचा मोठा अपव्यय होतो. यावर आता व्हॉटसअ‍ॅपनेच नवीन फिचर आणलंय.

नवीन फीचरला इनेबल केल्यानंतर पाठवण्यात आलेले मेसेज ७ दिवसांनंतर आपोआप गायब होतात. आता यातही कंपनीने बदल केलाय. त्याचा अवधी अगदी २४ तासांवर आलाय. व्हाट्सअ‍ॅपच्या iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे मेसेज अवघ्या २४ तासांत गायब होतील. मात्र, यात गंमत आहे. जो व्यक्ती मेसेज पाठवतो तोच ठरवेल की मेसेज गायब करायचा की नाही. त्याने इनेबल केल्यानंतर मेसेज चोवीस तासांत डिलिट होतील.

व्हाट्सअ‍ॅपच्या डिसअपिरिंग मेसेज फीचरमध्ये आताही ही सुविधा आहे. परंतु ती सात दिवसांची आहे. ज्याला मेसेज आलाय तो कॉपी करून ठेवू शकतो. स्क्रीनशॉटही काढता येईल. हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी जारी केलंय. iOS आणि Android सह सर्व सिस्टिमसाठी असेल. व्हॉटसअ‍ॅप महिन्याभरापासून या फीचरवर काम करीत आहे. ग्रुपमध्ये पाठवलेला मेसेज डिलिट होणार की नाही, याबाबत अद्यापि माहिती मिळू शकली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post