मुंबई ः मंत्री बच्चू कडू यांचा मतदारसंघ कोणताही असो. परंतु त्यांच्या कामाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. त्यांचे फेसबुकवरच नाही तर खऱ्या आयुष्यातही मोठे फॅन्स आहेत. त्याचं कामच हटके असतंय. त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात म्हणजे त्यांच्याबद्दलचा आदर आणखीच वाढेल,यात शंका नाही.
बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती येथे 1970 रोजी शेतकरी कुटुंबात झाला. इयत्ता नववी मध्ये असताना त्यांनी गावाच्या यात्रेत होणारा तमाशा आणि त्यातून होणाऱ्या मारामाऱ्या हा सर्व प्रकार बंद पाडून त् गावातील तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.
एके दिवशी आजारी मित्राला रक्तदान करताना वजन कमी पडत होते. डॉक्टरांनी आपले रक्त घ्यावे म्हणून बच्चू कडू यांनी खिशात दगडं ठेवले. त्यामुळे कडू यांचे वजन वाढले. त्यानंतर बच्चूभाऊंनी रक्तदान केलं. आणि मित्राचा जीव वाचवला होता. रक्तदानाचं शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.
प्रहार संघटनेमार्फत आजपर्यंत लाखांवर रक्त पिशव्यांचे दान करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता. चांदूर बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा बाहेर काढला होता.अपंगांना सायकल वाटप या प्रकरणात त्यांचे आणि काही शिवसेना नेत्यांचे वाद झाले. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली.
सन 1999 साली पहिली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.या निवडणुकीत प्रचारासाठी पैसे कमी पडले असताना त्यांच्या मित्रांनी घरातील दागिने मोडले. त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र सुद्धा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू या मित्रांचा अभिमानाने उल्लेख करतात .बच्चू कडू यांनी आपलं लग्न महात्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केलं आणि लग्नाचा खर्च वाचवून अपंगांना साहित्य वाटप केले. शासकीय अधिकारी काम करीत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये साप सोडणं, कार्यलयात सुतळी बॉंब फोडणं यासारखी आंदोलने केली.
सन 2004 साली ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. बच्चू कडू यांनी आतापर्यंत लाखो अपंगांना साहित्य वाटलं आहे. अजूनही आमदार बच्चू कडू साध्या घरात राहतात. त्यांच्या धर्मपत्नी या शिक्षिका आहेत. बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत, ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला .बच्चू कडू हे सर्पमित्र आहेत. त्यांना खेळाची ही खूप आवड आहे. त्यांना सामान्य माणसांप्रमाणे लोकांत राहायला आवडते. त्यांची बोलण्याची शैली प्रभावशाली आहे.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. हा पुरस्कार मिळवणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहेत. अपंगांकरिता 25 हजार लोकांचा दिल्ली येथे मोर्चा काढणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहेत. बच्चू कडू ची आंदोलनाचे विशेष म्हणजे निर्णय लागेपर्यंत ते आंदोलन सुरू ठेवतात. असा आमदार महाराष्ट्राला लाभला आहे, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे .असे आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून जाईल.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईला जर प्रश्न विचारला जर मुख्यमंत्री निर्णयातून झाला तर तुमची पसंती कोणाला असेल तर सोशल मीडियावर वावरणारी तरुणाई बच्चू कडू या माणसाला अग्रक्रम देते. सर्वसामान्य नागरिक म्हणून, भारतीय म्हणून बच्चू कडूसारख्या आमदाराला आपणही पाठिंबा द्यायला हवा. नामदार बच्चू कडू यांच्या कार्याला आणि पुढील वाटचालीला आमच्या महाराष्ट्र माझा टीमच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही ही हा लेख जास्तीत जास्त शेअर करून मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचावे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही वेळोवेळी बच्चूभाऊंच्या कार्याचे कौतुक केलं आहे. मंत्री झाल्यानंतर बच्चभाऊ अण्णांच्या भेटीला राळेगणसिद्धीला गेले होते.
(सोर्स केपी लाईव्ह)
Post a Comment