रोहितचा तो प्लॅन ठरला बाजीगर अन कोलकाता जिंकता जिंकता हरले

 

चेन्नई - आयपीएलच्या यंदाच्या मौसमात सुसाट निघालेल्या कोलकाता नाईट रायडर्सची मुंबई इंडियन्सने हवाच काढून घेतली. मुंबईची पोरं शेवटच्या क्षणापर्यंत काय करू शकतील हे सांगता येत नसल्याचा क्रिकेट जगताला पुन्हा प्रत्यय आला. सुर्यकुमार यादव 56(36) आणि रोहित शर्मा 43 (32) वगळता मुंबई इंडियन्स कोणालाच प्रभाव दाखवता आला नाही. 20 ओव्हरमध्ये 152 धावाच करता आल्या.

मुंबईचे हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्स एका झटक्यात पूर्ण करील असे वाटत होते. त्यांनी डावाची सुरूवातही तशीच झकास केली. नितीश राणा 57 (43) आणि शुभमन गिल 33 (24) यांनी 72 धावांची पार्टनरशीप करीत विजयाची चाहूल दाखवली. राहुल त्रिपाठी 5 (5), इयॉन मॉर्गन 7 (7) आणि गिल व राणाला तंबूत पाठवले.
खरा शो दाखवला बुमराहने त्याने कोलकाताच्या फलंदाजांना चेंडूला बॅटच लागू दिली नाही. त्यानेच मुंबईच्या बाजूने सामना झुकवला. बाकीचे काम ट्रेट बोल्टने केले. त्याने या षटकात दोन गडी बाद केले.

हरभजन सिंग आणि वरुण चक्रवर्तीने मुंबईविरूद्ध फिरकीचा तोफखाना उघडला. डिकॉकला माघारी धाडून चक्रवर्तीने गेम यशस्वी ठरवला. सुर्यकुमार पुन्हा एकदा तळपला. त्याने ३6 चेंडूत 56 धावा ठोकल्या. इथेच मुंबईचा डाव सावरला.  ईशान किशन, रोहित शर्माही फारसा तग धरू शकला नाही. प्रसिद्धने हार्दीकला चालते केले. रसेलने त्यांचा डाव गुंडाळला.

राहुल चाहर मुंबईसाठी तारणहार ठरला. त्याने मुंबई इंडियन्सला गेममध्ये आणले. कृणालने शाकिब हसनला माघारी धाडले. कार्तिक आणि रसेल या दिग्गज खेळाडूंना बुमराह व बोल्टने काहीच जमू दिले नाही. १३ चेंडूत १९ धावाही होऊ दिल्या नहाीत. मुंबईचा कर्णधार रोहितने शेवटच्या षटकाऐवजी त्यापूर्वीच षटक बुमराहला दिले. त्याने मुंबईला त्याच षटकात विजयासमीप नेले. बाकीचे काम बोल्टने केले. हा प्लॅन कारीगर ठरला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post