शाहरूखच्या केकेआर टीममध्ये खेळतो गोविंदाचा जावई

 


मुंबई: क्रिकेट आणि बॉलीवूडचे कनेक्शन कायम राहिले आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागौर यांच्यापासून ते विराट कोहली-अनुष्का शर्मापर्यंत पोहोचले आहे. दीपिका पदुकोन, सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग यांचेही नाते बॉलीवूडसोबत होते. असंच एक नातं आहे, जे कोणाला माहिती नाही.

काल झालेली हैदराबाद (Hyderabad) आणि कोलकाता (Kolkata)मॅच तुम्ही पाहिलीच असेल. त्यातील खेळलेला केकेआरचा एक खेळाडू गोविंदाचा जावई आहे. बॉलीवूडचा स्टार शाहरूख खानच्या याचा KKR संघ आहे. आहे.
या संघासोबत नीतीश राणा पहिल्यापासून आहे. त्याला मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. तो सुपरस्टार गोविंदाचा जावई आहे. द कपिल शर्मा शोमध्ये नीतीश राणानेच हा खुलासा केला होता. सुपरस्टार गोविंदा माझे सासरे आहेत असे त्याने सांगितले होते. 

कपील शर्माच्या शोमध्ये कॉमेडियन कृष्णा असतो. नीतीश राणाची बायको साची ही त्याची मावस बहीण आहे. ती गोविंदाची भाची आहे. त्यामुळे तो गोविंदाचा भाचेजावई लागतो. नीतीशने काल तुफान बॅटिंग करून कोलकाता नाईट रायडर्सला जिंकून दिले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post