राज्यात लॉकडाउनचे संकेत, दहावी-बारावी परीक्षा होणार जूनमध्ये

 
 

अहमदनगरः कोरोनामुळे राज्यावरच नव्हे तर देशावर संकट आहे. जगातही तीच स्थिती आहे. अशा स्थितीत सर्वांनी एक राहण्याची गरज आहे. परंतु आपले विरोधक राजकारण करीत आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेते एकजुटीने निर्णय घेत आहोत. लोकांवर आलेले हे संकट परतून लावण्याचे काम करीत आहोत, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

विरोधक राजकारण करीत असले तरी आम्ही त्यांना विचारात घेत आहोत. मुख्यमंत्री लवकरच लॉकडाउनबाबत त्यांच्यासोबत चर्चा करतील. नगरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे बळी गेले आहेत. ही भयावह स्थिती आहे. मृत्यूचे प्रमाण अगदी शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी कडक निर्णय घ्यावे लागतील, असे म्हणत लॉकडाउन करण्याबाबतचे संकेत दिले.

लॉकडाउन लागल्याने उद्योग-व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत सावळा गोंधळ सुरू आहे. तो रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील. ज्याला इंजेक्शनची गरज आहे, त्यालाच ते दिले पाहिजे. या यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

दहावीची परीक्षा जूनमध्ये
दहावी आणि बारावीची परीक्षा जूनमध्ये घेण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर दबाव वाढत आहे. कालच सर्व आमदारांसोबत त्यांनी बैठक घेतली. त्यात बहुतांशी आमदारांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मत व्यक्त केले. जूनमध्ये  अॉफलाईन परीक्षा घेण्याचे घाटत आहे. सध्या एमपीएससीची परीक्षा स्थगित केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post