गडाखसाहेबांच्या आरोग्यासाठी सर्वधर्मियांची प्रार्थना, प्रशांत पाटलांची पोस्ट होतेय व्हायरल...

 

अहमदनगर ः ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांच्यावर सध्या पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ते मागील पंधरवड्यात कोरोनाबाधित झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संदर्भात त्यांचे चिरंजीव प्रशांत पाटील गडाख यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. सोशल मीडियातून ती व्हायरल होते आहे.

माझे वडील हे गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात अॅडमिट आहेत. त्यांना भेटण्यास मनाई आहे. तुमच्याकडून मला सहानुभूती नको आहे. साहेब नेहमी प्रार्थना स्थळांबाबत सांगायचे, जिथे सायन्स संपते तिथून अध्यात्म सुरू होतं. नेवासा, नगर आणि राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे सर्वांसाठीच प्रार्थना करण्याची गरज आहे. आपण घरीच राहून प्रार्थना करा. त्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते. अध्यात्म आणि सायन्स असं दोघांच्या मेळातून साहेबांना लवकर बरे करू, अशा आशयाची प्रशांत पाटील गडाख यांची फेसबुक पोस्ट आहे. ही पोस्ट करताना त्यांनी साहेबांवर उपचार सुरू असतानाचा फोटो शेअर केला आहे.

प्रशांत पाटील यांची ही भावनिक पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. आपापल्या पद्धतीने प्रार्थना केली जात आहे. सर्व धर्मियही त्यांच्यासाठी करीत आहेत. ही पोस्ट शेअर करून माहिती दिली जात आहे.

यशवंतराव गडाख यांचे राज्याच्या राजकारणात मोठे योगदान आहे. राजकारणाला सांस्कृतिक वळणावर नेण्यात ते अग्रेसर राहिले आहेत. आपल्या पिढीलाही त्यांनी आदर्श घालून दिलाय. साहित्यिक म्हणूनही त्यांचे मोठे नाव आहे. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा गरिबांच्या दारात आणली. कारखान्यामुळे समृद्धी नांदली. त्यांच्या प्रकृतीसाठी सर्वच प्रार्थना करीत आहेत. ते लवकर या आजारातून बाहेर पडतील, असा सर्वांनाच विश्वास आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post