रामदेव बाबांनी वर्षातच तोट्यातील कंपनी आणली नफ्यात


नवी दिल्ली ः रामदेव बाबा (Ramdeobaba)यांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी आतापर्यंत रूचि सोयामुळे कर्जबाजारी (Loan) झाली होती. परंतु बाबांच्या मॅनेजमेंटमुळे सर्व कर्ज नील झाले आहे. विशेष म्हणजे ही कंपनी नफ्यात आहे.
 

रामदेव बाबा यांनी २०१९मध्ये रूचि सोया कंपनीसाठी तब्बल ३२०० कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. बाबांना सर्वाधिक कर्ज देशातील सरकारी बँक असलेल्या एसबीआयने (Sbi bank) दिले होते. त्या बँकेने एक हजार २०० कोटी रूपये कर्ज दिले होते. पंजाब नॅशनल बँकेने ७०० कोटी रूपये, युनियन बँक अॉफ इंडियाने ६०० कोटी रूपये, सिंडिकेट बँकेने ४०० कोटी रूपये, इलाहाबाद बँकेने ३०० कोटी रूपयांचे कर्ज दिले होते.

अडानी समूहाला टाकले मागे
रूचि सोया ही कंपनी दिवाळखोरीत निघाली होती. स्टँडर्ड चार्टर्ड बँक, डीएसबी बँक, सेंट्रल बँकेचेही कर्ज होते. बाबा रामदेव यांनी ही कंपनीसाठी ४ हजार ३२५ कोटी रूपयांची बोली लावली होती. या लिलावात अडानी ग्रुपही आघाडीवर होता. परंतु रामदेवबाबांनी बाजी मारली. आतापर्यंत कर्जाच्या खाईत असलेली ही कंपनी बाबांनी आपल्या मार्केटिंग स्किलने २२७. ४४ कोटी रूपये नफ्यात आणली. आता या कंपनीचे उत्पन्न ४ हजार ४७५ कोटी रूपये झाले आहे. गेल्या वर्षी ते ३ हजार ७२५ कोटी रूपये होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post