भाजपच्या सचिन पोटरेंनी टेरेसवर फुलवला मळा, रोज भरते तेथे पक्षांची शाळा!

 अहमदनगर ः भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धप्रमुख सचिन पोटरे यांनी पक्षात मानाचे स्थान मिळवले आहे. प्रसिद्धीप्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यापासून त्यांनी विरोधकांना जेरीस आणले आहे. सोशल मीडियात तसेच मीडियाच्या माध्यमातून ते योग्य पद्धतीने सरकार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीकास्त्र सोडत असतात. शिवसेना आणि मनसेत असतानाही त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करीत नागरी प्रश्नांना वाचा फोडली होती.
 

विरोधकांना केवळ पत्रकबाजी करून जेरीस आणत नाही तर त्यांचे चांगल्या उपक्रमाचेही ते कौतुक करतात. सध्या कर्जत शहरात स्वच्छतेचा जागर सुरू आहे. त्यांनी तसेच त्यांची पत्नीने घराच्या टेरेसचा योग्य वापर सुरू केला आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण तर होतेच, परंतु घरच्या घरी सेंद्रीय भाजीपालाही त्यांना खायला मिळत आहे. या त्यांच्या टेरेस गार्डनमध्ये चिऊ-काऊसह इतर पक्षीही येत आहेत.विशेष म्हणजे घरातील ओला व सुक्या कचऱ्यावर त्यांनी ही बाग फुलवली आहे. तब्बल 700 स्क्वेअर फूटमध्ये ही बाग आहे. तीनशे झाडांचा त्यात समावेश आहे. कचऱ्यातून त्यांनी कंपोस्ट खत तयार केलं आहे. ते खतातून त्यांना फळे तसेच भाजीपाला मिळत आहे.
 
कशी आहे टेरेस गार्डन
टेरेस गार्डनवर फळांमध्ये आंबा, चिकू, सीताफळ, संत्रा, मोसंबी, लिंबू, पेरू, अंजीर आदींचा समावेश आहे. पालेभाज्यांमध्ये कारले, आळूची पाने, मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो, काकडी, हादग्याची फुले, वाल, तांदूळचा, चिघळाची भाजी, पाथरीची भाजीही त्यांच्या टेरेसवरील मळ्यात पिकत आहे.

औषधी वनस्पतीमध्ये कृष्ण तुळस, रान तुळस, गवती चहा पुदिना, पानफुटी, शोभेच्या झाडांमध्ये विविध रंगी गुलाब, रानचाफा, सोनचाफा, मोगरा, सर्व प्रकारच्या रेनलिली, विविध प्रकारचे जास्वंद, शेवंती, चिनी रातराणी, तागडा, निशिगंध  गुलाब, गोकर्ण, सदाफुली, कागदी फुले विविध फुलांची झाडे व रोपे आहेत.

पिंपळ, कडुनिंब व इतर फळांच्या झाडांवर बोन्सायचा प्रयोग चालू आहे. विविध ऋतूंमध्ये त्यांच्या कुटुंबियांना ही फळे खायला मिळत आहेत. या टेरेसवरच्या बागेत रोज अनेक प्रकारचे पक्षी येतात. या पक्षांना पाणी आणि धान्य खाण्यासाठी ठेवल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जात आहे.

गार्डनमध्ये मधमाशांनी पोळं तयार केलं आहे.. पर्यावरणाच संतुलन होण्यासाठी व आपला घरातला कचरा घरातच त्याच्यावर प्रक्रिया होऊन आपले शहर स्वच्छ ,सुंदर व हरित कर्जत होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या दारात किंवा टेरेसवर अशा गार्डन करून  "माझा कचरा..माझी जबाबदारी " या मोहिमेंतर्गत शहराला स्वच्छता अभियानात अव्वल स्थान मिळण्यासाठी आपलं योगदान दिले पाहिजे. आमचा हा छोटेखानी प्रयत्न आहे.
-सुवर्णा सचिन पोटरे, कर्जत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post