आता सचिन वाझेंचाच सरकारवर लेटर बॉम्ब, राष्ट्रवादीसह शिवसेनाही घायाळ

मुंबई ः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर उभ्या केलेल्या स्फोटकांच्या वाहनाचा मालकमनसुख हिरेन याची हत्या झाली होती. त्या प्रकरणात एपीआय सचिन वाझे आरोपी आहे. त्यांनी एनआयएला एक पत्र लिहिलंय. त्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री शिवसेना नेते अनिल परब यांचे नाव आहे. विशेष म्हणजे वाझे यांचे हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालंय.

वाझे पत्रात लिहितात, "मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून हप्तावसुली करण्यासाठी सांगितलं होतं. हे असले काम करण्यास मी नकार दिलेला असताना त्यांच्या पीएने मला राजी करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मी आयुक्त परमबीर सिंग यांना दिली. त्यांनीही असले काम करण्यापासून रोखले. देशमुख यांनी माझ्यावर दबाव टाकला होता. निलंब


न रद्द करून सेवेत घेतल्याने शरद पवार नाराज आहेत. त्यांना मी जे सांगायचे ते सांगतो. परंतु त्यासाठी मला दोन कोटी रूपये तुला द्यावे लागतील. एवढी पैसे माझ्याकडे नाहीत, असे सांगितल्यावर ते म्हणाले. ती रक्कम नंतर दिली तरी चालेल.

परब यांनी ५० कोटी मागितले
"शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप लावला आहे. सैफी बुऱ्हानी ट्रस्टसोबत ५० कोटी रुपयांची बोलणी कर. त्यांच्याकडून पैसे वसूल झाले पाहिजेत, असेही परब यांनी सांगितल्याचं ते पत्रात म्हणतात.
विशेष म्हणजे एनआयए कोर्टात वाझे यांनी आपण कोणतीच कबुली दिलेली नसल्याचे सांगितलं होतं. यानंतर हे पत्र व्हायरल झाल्याने लोकांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post