रेमडेसिवीर इंजेक्शनला आहेत आठ पर्याय, डॉक्टर म्हणतात...

 


 

मुंबई - सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. जास्त सिरीयस असलेल्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जात आहे. परंतु त्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा आहे. काहीजण याचा काळाबाजार करीत आहेत. खरोखर हे इंजेक्शन उपयोगी आहे. का किंवा त्याला पर्याय आहे, याचा आढावा वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलून घेऊया.

स्पाईक प्रथिनाला प्रतिबंध करणाऱ्या आठ औषधांचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) केंद्राने हे संशोधन केलं आहे.

कोरोना विषाणूवरील काट्यासारखे दिसणारे स्पाईक प्रथिने माणसाच्या पेशीत शिरतात. या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्याठी हे प्रथिनेच नष्ट झाली पाहिजे, यासाठी संशोधन सुरू आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल आठ औषधांचा डोस संशोधकांनी शोधून काढला आहे.

नवीन औषधे बाजारात येण्यासाठी चाचण्या आवश्यक आहेत. सध्या बाजारात रेमडेसिवीरला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यावरच अवलंबून राहावे लागते.

नवीन औषधे शोधून काढली आहेत. परंतु त्याचे जास्तीत जास्त टेस्टिंग व्हायला हव्यात. त्याचे इफेक्ट कसे येतात, हे तपासल्यानंतर ते रूग्णांना देणे योग्य राहील, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सध्या तरी सामान्य लोकांना ते उपलब्ध नसेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post