टकाटक-2 बॉक्स अॉफिसवर घालणार "धुमाकूळ"

 


मुंबई -‘टकाटक’ या सिनेमाचा सिक्वेल येत आहे. मिलिंद कवडे या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. टकाटकला परीक्षकांनी चांगले रेटिंग दिलेलं होतं. बॉक्स अॉफिसवरही या सिनेमा हीट ठरला. टकाटकचा व्यवसायही नावासारखाच टकाटक झाला. त्याने अनेक विक्रम केले. लॉकडॉऊनची चर्चा सध्या सुरू आहे. त्या वातावरणाचे मळभ असतानाही ‘टकाटक 2’ येतो. या घोषणेमुळे सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम तसेच सहनिर्माते जगत सिंग यांनी ‘टकाटक 2’ची अधिकृत घोषणा केलीय. या वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक 2’चं मोशन पोस्टर लाँच झालंय. ‘टकाटक’ची कथा तरूणाईवर होती. या सिनेमातून एक मेसेजही देण्याचा प्रयत्न झालाय.

‘टकाटक 2’ची कथा नेमकी काय आहे, याविषयी उत्सुकता लागली आहे. मिलिंद कवडे हे दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनीच ‘टकाटक 2’ची कथा आणि पटकथा लिहिलीय. या चित्रपटातील संवाद आहेत किरण बेरड यांचे. गीतकार आहेत जय अत्रे. वरूण लिखते यांनी संगीत दिलंय. हजरत शेख वली यांनी कॅमेरामनची भूमिका साकारलीय. ‘टकाटक 2’मधील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात आहेत.

‘टकाटक’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. त्यामुळेच ‘टकाटक 2’घेऊन येत आहोत, असं दिग्दर्शक कवडे यांनी सांगितलं. ‘टकाटक 2’मध्ये प्रेक्षकांना सुमधूर गीत-संगीताने सजलेली नवी कोरी प्रेमकथा पाहायला मिळेल. ‘टकाटक’च्या यशामुळे आणखी जबाबदारी वाढलीय. टकाटक -२ नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे कवडे सांगतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post