लस घेतल्यानंतरही यशवंतराव गडाख कोरोना बाधित, मंत्री गडाखही पॉझिटिव्ह

अहमदनगर: राज्यात दररोज कोरोनाबाधितांचा विस्फोट होतो आहे. लोकांना अॉक्सिजन बेड मिळणेही मुश्कील झालं आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि त्यांचे कुटुंबीयही बाधित होऊ लागले आहे. नगर जिल्ह्यातील शिवसेनेतील एका मंत्र्यांसोबत घरातील चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.


जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा अहवाल बाधित आला आहे. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांकडून ही माहिती देण्यात आली. 

कोरोनाबाधित आल्यानंतर गडाख म्हणतात, माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. मी होम क्वारंटाईन झालो आहे. माझ्या संपर्कातील लोकांनी टेस्ट करून घ्यावी. तसेच सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. यापूर्वी कुटुंबातील सदस्य बाधित झाल्याने मंत्री गडाख होम क्वारंटाईन झाले होते. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी १९ मार्च रोजी कोरोनाची लस घेतली होती. तरीही ते बाधित झाले आहेत.

नगर शहरात दररोज किमान दीड ते दोन हजार पेशंट आढळून येत आहेत. सरकारने पूर्ण लॉकडाउन केलेले नाही, त्यामुळे लोकांमधील बेफिकिरी कमी झालेली नाही. नियमांचे पालन केले तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post