मेहेकरीत कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली, सभापती गुंड व पोटेंच्या पाठपुराव्यास यश

 


मेहेकरी
ःं  नगर तालुक्यातील कोविडची स्थिती गंभीर झाली आहे. रूग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. गावोगाव रूग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर मेहेकरी येथील श्री सदगुरू हायस्कूल येथे कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मेहेकरी येथील हायस्कूलच्या जागेची पाहणी करण्यात आली. या कोविड सेंटरसाठी सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनी सुरूवातीपासूनच पाठपुरावा सुरू ठेवला होता. सभापती सुरेखा गुंड यांनीही पंचायत समितीतील बैठकीत सेंटरसाठी आग्रह धरला होता.

कोविड सेंटरच्या जागेची पाहणी करताना नगर राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शरद बडे व सामाजिक कार्यकर्ते सुधीर वायकर व मेहेकरी सज्जाचे मंडलाधिकारी झाडे व तलाठी पवार, ग्रामसेवक पालवे व सोनेवाडीचे ग्रामसेवक गिरी व विस्तार अधिकारी माळी व सोनेवाडीचे सरपंच सुरेश चांदणे व हायस्कूल कर्मचारी सचिन पंडीत उपस्थित होते.
 

या हायस्कूलमध्ये कोविड सेंटर उभारण्याचा मानस आहे. नगर तालुक्यात कोविड सेंटर चालू करावे, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुधीर पोटे यांनी मागणी केली होती. नगर महसूल विभागाने मेहेकरी आणि सारोळा कासार येथील महसूल प्रशासनास सेंटर चालू करण्याविषयी तहसीलदार उमेश पाटील यांनी आदेश दिले. त्यामुळे कोविड सेंटरचा मार्ग मोकळा झाला आहे.

तहसीलदारांचे आभार, चास व रूईचाही विचार

रुई छत्तिसी व चास येथील कोविड सेंटरबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल, असे नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील साहेबांनी सांगितले. आपण अडचणीच्या काळात नगर तालुक्यातील जनतेची काळजी घेतात, त्याबद्दल आपले आणि प्रशासनाचे मनपूर्वक आभार, अशा भावना सुधीर पोटे यांनी व्यक्त केल्या आहेत.
 

सभापती गुंड यांचाही हिरवा कंदील

पंचायत समितीत कोविड सेंटरबाबत तसेच कोरोना आढावा बैठक झाली. त्यावेळी मेहेकरी येतील कोविड सेंटरबाबत सभापती सुरेखा गुंड यांनी मागणी लावून धरली होती. तसेच याबाबत सामाजिक कार्यकर्ते पोटे यांनी सुरूवातीपासून प्रश्न कोविड सेंटरसाठी पाठपुरावा केला. 

माजी आमदार राहूल दादा जगताप यांनीही कोविड सेंटरसाठी मदत करण्याचे जाहीर केलं आहे. या कोविड सेंटरसाठी सर्वांनीच हातभार लावल्याने कोविड सेंटर उभारणीत कोणतीही अडचण जाणवणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post