कराळे कोचिंग क्लासेसला मानाचा पुरस्कार, मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला

अहमदनगर/ महाराष्ट्र माझा
अहमदनगर शहरातील सावेडी मधील कराळे एज्युकेशन संस्थेच्या कोचींग क्लासला 'नवभारत' चा 'बेस्ट कोचिंग क्लास' चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला . सोमवारी (30 ऑगस्ट) मुंबईत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते क्लासेसचे संचालक सुनील व बबन कराळे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मान केला .
 खाजगी क्लासेस म्हटलं की, सामान्यत :डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे चकाचक ऑफिस आणि सामान्य लोकांना असामान्य वाटणारी फी. पण याच प्रतिमेला डावलून हुशार व गरजू विदयार्थ्यांना अतिशय माफक फी मध्ये राष्ट्रीय पातळीवरील दर्जाचे शिक्षण देण्याचे काम कराळे एज्युकेशन करत आहेत. जेथे
स्वांतत्र्याच्या 75 वर्षानंतरही साधी बस ही जात नाही त्या दुर्गम, ग्रामीण भागातून आलेले  
'कराळे मॅथ्स अकॅडमी अहमदनगर ' चे संचालक प्रा . सुनिल कराळे व 
B K PHYSICS अकॅडमीचे संचालक प्रा . बबन कराळे हे दोन भावंडे गेल्या दशकापासून शहरात एज्युकेशन क्लासेस चालवित आहेत.
प्रा .सुनिल यांनी Government  Autonomous College मधून B.Tech व प्रा . बबन यांनी BE पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी खुणावत असतानाही क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी क्लासेस लावण्यासाठी आपल्याला जो संघर्ष करावा लागला तो इतर गरीब विद्यार्थ्यांच्या वाटेला येऊ नये म्हणून तसेच या व्यवसायाकडे PASSION म्हणून बघता कराळे बंधूंनी या क्षेत्रात पाऊल टाकले. अहमदनगर शहरात अवघ्या चार विद्यार्थ्यांना घेवून सुरू झालेला त्यांचा हा उपक्रम आज सुमारे एक दशकानंतर अकॅडमीमध्ये रूपंतरित झाला. दरवर्षी सुमारे 400 ते 500 विद्यार्थी कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपले स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील असतात.
अकॅडमी मधून IIT 'S, Government Autonomous college तसेच विविध नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज ,medical  collage ला अॅडमिशन घेणाऱ्या विदयार्थ्यांचा आलेख वाढतच आहे. तसेच अकॅडमी मधून उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत याचबरोबर खूप सारे विदयार्थी National/Multinational कंपन्यामध्ये जॉब करत आहेत . त्याचबरोबर काही विद्यार्थी सरकारी व निमसरकारी क्षेत्रातही काम करत आहेत. त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने Class हा सरांचा Passion  आहे हे सिदध झाले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post