कराळे कोचिंग क्लासेस चा सत्कार

प्रा बबन कराळे व प्रा सुनिल कराळे यांना बेस्ट कोचिंग क्लास  अवार्ड मिळाल्याबद्दल सत्कार करताना 
मा आमदार संग्राम (भैया) जगताप आणि अहमदनगर मनपा.सेवानिवृत्त पाणीपुरवठा विभागप्रमुख श्री.महादेव काकडे साहेब आणि श्री. दिगंबर कराळे.

'कराळे मॅथ्स अकॅडमी अहमदनगर ' चे संचालक प्रा . सुनिल कराळे व 
B K PHYSICS अकॅडमीचे संचालक प्रा . बबन कराळे हे दोन भावंडे गेल्या दशकापासून शहरात 11वी,12वी science  & इंजिनियरिंग,मेडिकल प्रवेश परीक्षेचे क्लासेस  चालवित आहेत.
प्रा .सुनिल यांनी Government  Autonomous College मधून B.Tech व प्रा . बबन यांनी BE पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी खुणावत असतानाही क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी क्लासेस लावण्यासाठी आपल्याला जो संघर्ष करावा लागला तो इतर गरीब विद्यार्थ्यांच्या वाटेला येऊ नये म्हणून तसेच या व्यवसायाकडे PASSION म्हणून बघता कराळे बंधूंनी या क्षेत्रात पाऊल टाकले. अहमदनगर शहरात अवघ्या चार विद्यार्थ्यांना घेवून सुरू झालेला त्यांचा हा उपक्रम आज सुमारे एक दशकानंतर अकॅडमीमध्ये रूपंतरित झाला. दरवर्षी सुमारे 400 ते 500 विद्यार्थी कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपले स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील असतात.
अकॅडमी मधून IIT 'S, Government Autonomous college तसेच विविध नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज ,medical  collage ला अॅडमिशन घेणाऱ्या विदयार्थ्यांचा आलेख वाढतच आहे. तसेच अकॅडमी मधून उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत याचबरोबर खूप सारे विदयार्थी National/Multinational कंपन्यामध्ये जॉब करत आहेत . त्याचबरोबर काही विद्यार्थी सरकारी व निमसरकारी क्षेत्रातही काम करत आहेत. त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने Class हा सरांचा Passion  आहे हे सिदध झाले आहे .याबाबद्दल मा आमदार साहेबांनी कौतुक केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post