स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २७ सप्टेंबरला आॕनलाईन सरपंच स्वच्छता संवाद

अहमदनगर:
       भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयात शाश्वत स्वच्छतेसाठी महाजागर सुरु आहे.स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत सोमवार २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते २ या दरम्यान जिल्ह्यातील सर्व सरपंच यांच्यासाठी" स्वच्छता संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
     जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्याने आता स्वच्छतेचे सातत्य , शाश्वतता व हागृणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस ) या उद्देशाने भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयात शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम सुरु आहेत.या उपक्रमांतर्गतच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्याशी झूम ॲप या अॉनलाईन प्रणालीद्वारे व फेसबूक च्या माध्यमातून दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ११ते १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व सरपंच यांच्यासाठी' सरपंच स्वच्छता संवाद या उपक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.ना.सौ राजश्री ताई घुले पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच जल जीवन मिशन ची प्रकल्प संचालक सुरेश शिंदे हे
    ऑनलाईन प्रणाली द्वारे व फेसबुक लाईव्ह च्या  माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सरपंचांना मार्गदर्शन करणार आहेत. या संवाद उपक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य पंचायत समितीचे सर्व सभापती , सर्व सदस्य व सर्व सरपंच सहभागी होणार आहेत असेही मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.सदर अॉनलाईन सरपंच स्वच्छता संवाद उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्व सरपंच यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक सुरेश शिंदे यांनी केले.
---------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post