आझादी का अमृतमहोत्सव अभियानात लोकांचा सहभाग महत्त्वाचा-जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री ताई चंद्रशेखर घुले पाटील


अहमदनगर दि 27
स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यासाठी   घोषणा करण्यात आली असून या सर्व उपक्रमात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले गाव शाश्वत स्वच्छतेकडे घेऊन जाण्यासाठी या सर्व उपक्रमात  सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री ताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी  सरपंच स्वच्छता सवांद या ऑनलाईन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन वतीने येथील आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र क्षीरसागर ,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य ,सरपंच व उपसरपंच  उपस्थित होते. यावेळी बोलताना   जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री ताई चंद्रशेखर घुले पाटील म्हणाल्या की
गाव सर्वांगिण विकसीत करण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.आज पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही तितकेच महत्त्वाचे तसेच गावे शाश्वत करण्यासाठी सर्वांनी स्वच्छता सर्वैक्षण मध्ये सहभागी व्हावे हे अभियान
सर्वेक्षण १ ते ३१ आक्टोबर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणदरम्यान होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात उत्कृष्ठ ठरणारे जिल्हे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.उत्कृष्ट काम करणाºया जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाºया सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत झालेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. यामध्ये हागणदारीमुक्त गावाची पडताळणी, शौचालयांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली जाणार आहे.
प्रत्यक्ष पाहणीअंतर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडा बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
 या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीणभागातील  नागरिकांची स्वच्छतेविषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविली जाणार आहे.देशभरातील गावांचा समावेश स्वच्छाग्रही खुली बैठक, व्यक्तिगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत.प्रत्येक तीन ते चार गावांचे सरपंच, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायत सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे.गावाच्या पाहणीदरम्यान गावाची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन स्थिती व कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली जाईल.
             यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर मार्गदर्शन करताना म्हणाले की 
आझादी का अमृतमहोत्सव निमित्ताने जिल्ह्यातील गावागावात 
 हागणदारीमुक्त शाश्वतता टिकविणे यासाठी 1 सप्टेंबर 2021 पासुन वेगवेगळे * चार अभियान चालु आहेत.तरी याबाबत अंमलबजावणी  करण्यात येत आहे
*1)1 सप्टेंबर 2021 ते 15 आगस्ट 2022
या कालावधीत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपक्रम
*२)*घोष वाक्य लेखन स्पर्धा
*3) सार्वजनिक ठिकाण भिंती रंगविणे
*4) 100 दिवसांचे  शौषखड्डे स्थायित्व व सुजलाम अभियान
*5)स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामिण2021
असे पाच अभियान चालु आहेत.यात जिल्ह्यात 40000  हजार शोषखड्डे करणार असल्याचे सांगितले.त्यासाठी सर्व सरपंचांनी व ग्रामसेवक यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले या प्रसंगी  सुरेश शिंदे प्रकल्प संचालक जलजीवन मिशन यांनी प्रास्तविक करताना उपस्थितांना हागणदारीमुक्त अधिक या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की. गावे अधिक शाश्वत स्वच्छता करण्यासाठी सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे या गावातील महिला बचत गट, सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असणारे युवा कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन चळवळ उभी करावी असे ते म्हणाले.  यावेळी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व  सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post